राष्ट्रीय

Breaking 2026 : Tribal Religion

जनगणनेच्या ७ व्या कॉलममध्ये ‘आदिवासी धर्म’ लिहाच! : शिवाजीराव मोघे यांचे आवाहन

Record it as Tribal Religion : आपल्यावर झालेला सर्वात मोठा अन्याय म्हणजे आपली मूळ ओळख हिरावून घेणे : शिवाजीराव मोघे, माजी सामाजिक न्याय मंत्री

Tribal Religion : अस्मितेची नवी पहाट : टिटवी येथे ‘ चौथी आदिवासी धर्म चिंतन परिषद ’ उत्साहात संपन्न !

Tribal Religion : जनगणनेच्या ७ व्या कॉलममध्ये ‘आदिवासी धर्म’ लिहाच! : शिवाजीराव मोघे यांचे आवाहन 

www.lonarnews.com, 25.10.2026 Sunday

जल-जंगल-जमीन आणि निसर्गपूजक संस्कृती उराशी बाळगणाऱ्या आदिवासी समाजाच्या अस्मितेचा एल्गार टिटवी (ता. लोणार) या ऐतिहासिक भूमीत घुमला. येथे आयोजित ‘चौथी आदिवासी धर्म चिंतन परिषद’ हजारो बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्रभर सुरू झालेल्या या वैचारिक चळवळीने टिटवी येथे महाकाय रूप धारण केले असून, आदिवासी समाज आता आपल्या धार्मिक ओळखीसाठी जागा झाला असल्याचा सूर या परिषदेतून उमटला. (Tribal Religion)

Tribal Religion

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी सामाजिक न्याय मंत्री तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव मोघे होते. परिषदेचे उद्घाटन बिरसा क्रांती दलाचे संस्थापक-अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या हस्ते झाले. यावेळी बिरसा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक डी. बी. अंबुरे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे (नवी दिल्ली) राम चव्हाण, माजी सनदी अधिकारी संभाजीराव सरकुंडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

Tribal Religionयाप्रसंगी गिरिजा उईके, नंदिनी टारपे, डॉ. आरती फुफाटे, कार्तिका संतोष ठाकरे, सतीश पाचपुते, संतोष ठाकरे, विनोद भोकरे, भागवत काळे, सुधाकर पांडे, सिमा डाखोरे, समाधान धंदरे, गणेश लठाड, कल्पना धंदरे, अर्चना अंभोरे, शांता अंबुरे, पूनम साखरकर, रमेश साखरकर, नारायणराव कराळे, शेखोराव कबले, डॉ. हरिभाऊ फुफाटे, सेवानिवृत्त तहसीलदार ध्यानदेव फुफाटे, राजेश अंबुसकर, मच्छिमार संघाचे जिल्हाध्यक्ष कचरुबा भारस्कर, विक्रम कचवे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. (Tribal Religion)
Tribal Religionदरम्यान  भगवानराव कोकाटे यांचा  वाढदिवस असल्याने उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी धर्म चिंतन परिषद आयोजन केल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. भगवानराव कोकाटे यांनी कोणताही इतर अवाजवी देखावा वा खर्च न करता समाजाप्रती असलेली जान ठेवत हा कार्यक्रम आयोजित केल्याने उपस्थित सर्वांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी भगवानराव कोकाटे यांचे जावई डॉ.नामदेव डाखोरे यांनी त्यांना एक तोळा सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली. जावयाने सासऱ्याला सप्रेम भेटवस्तू देणे हाही एक कौतुकाचा विषय ठरला.
मूळ ओळख हिरावून घेणे हाच मोठा अन्याय: शिवाजीराव मोघे
अध्यक्षीय भाषणात शिवाजीराव मोघे म्हणाले, “आपल्यावर झालेला सर्वात मोठा अन्याय म्हणजे आपली मूळ ओळख हिरावून घेणे. १८१७ ते १९३१ च्या इंग्रज काळापर्यंत आपल्याला ‘ॲबओरिजनल’, ‘ॲनिमिस्ट’ म्हणजे निसर्गपूजक म्हणून ओळखले जायचे. इंग्रजांनीही आपल्या अस्तित्वाची दखल घेतली होती. पण १९५१ नंतर जनगणनेत संगणक आला आणि हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शिख या सहा धर्मांनाच कोड दिला गेला. आपला भोळा समाज या सहा चौकटीत विभागला गेला.”

त्यांनी पुढे आवाहन केले की, “आज भारतात ७०५ जमाती आणि १० कोटींहून अधिक आदिवासी आहेत. आगामी जनगणनेत फॉर्ममध्ये सहा धर्माचे कॉलम असले तरी ७ वा कॉलम ‘इतर’ (Others) साठी आहे. त्या ७ व्या कॉलममध्ये ठामपणे ‘आदिवासी धर्म’ अशीच नोंद करा. प्रगणक घरी आल्यास हीच नोंद घेण्याचा आग्रह धरा. ही नोंद म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांच्या अस्तित्वाची सनद आहे.” (Tribal Religion)

‘आदिवासी’ विरुद्ध ‘वनवासी’ – हा अस्मितेचा संघर्ष: दशरथ मडावी
उद्घाटक दशरथ मडावी यांनी ‘आदिवासी’ आणि ‘वनवासी’ शब्दातील वैचारिक संघर्ष स्पष्ट केला. ते म्हणाले, “आदिवासी म्हणजे ‘आदी’ काळापासून राहणारा, या देशाचा मूळनिवासी. पण आदिवासींना मूळनिवासी मान्य केले तर स्वतःला ‘नंतर आलेले’ मानावे लागेल, या भीतीने १९५२ पासून ‘वनवासी’ शब्द लादण्याचा प्रयत्न झाला.”
“विश्वकोशानुसार ‘वनवासी’ म्हणजे ज्याला स्वतःचा देश नाही, भाषा नाही, संस्कृती नाही, धर्म नाही असा घटक. या देशाचा मूळ मालक असलेला समाज हा अवमान कधीही सहन करणार नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार धर्म निवडण्याचा अधिकार दिला आहे. म्हणून येत्या २०२७ च्या जनगणनेत रक्ताचा थेंबही न सांडता, अहिंसक वैचारिक मार्गाने आपली ओळख ‘आदिवासी धर्म’ म्हणून नोंदवूया. ही एक मोठी शांततामय सांस्कृतिक क्रांती ठरेल.”
(Tribal Religion)
कागदोपत्री नोंदच खरी ओळख – आरक्षणापलीकडचा विचार करा: डी.बी.अंबुरे
प्रमुख मार्गदर्शक डी. बी. अंबुरे यांनी लिखित पुराव्याचे कायदेशीर महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “आपण अभिमानाने स्वतःला आदिवासी म्हणतो, पण शासकीय दप्तरी आपली ‘आदिवासी धर्म’ म्हणून नोंदच नाही. २०११ नुसार १० कोटी लोकसंख्या आणि ७०५ जमाती असूनही अधिकृत ओळख नाही, ही शोकांतिका आहे.”
“भारतीय राज्यघटना लिखित आहे. लिखित पुराव्याशिवाय हक्क मिळत नाही. एखाद्या गावाला आपले गाव म्हणतो, पण ७/१२ आपल्या नावावर असेल तरच आपण तिथले रहिवासी ठरतो. शाळेत प्रवेशच नसेल तर टीसी मिळणार नाही. तसेच, सेन्सस रजिस्टरमध्ये ‘आदिवासी धर्म’ अशी नोंद झाली तरच आपण छातीठोकपणे मूळनिवासी असल्याचे कायदेशीररित्या सांगू शकू.”

ते पुढे म्हणाले, “आज ७०५ जमाती आरक्षणामुळे एकत्र आहेत. उद्या आरक्षण संपले तर एकत्र बांधणारा दुवा कोणता? आपसात रोटी-बेटी व्यवहारही पूर्णपणे होत नाही. अशावेळी आपण तुकड्या-तुकड्यात विभागून अल्पसंख्याक होऊ आणि अल्पसंख्याकांवर अन्याय होतो, हा इतिहास आहे. म्हणून आरक्षणाच्या पलीकडे जाऊन ‘आदिवासी धर्म’ हेच भविष्यातील एकतेचे महासूत्र आहे. ‘आदिवासी’ हा शब्द सर्व ७०५ जमातींना मान्य आहे.” (Tribal Religion)

Tribal Religionमहाराष्ट्रात वैचारिक क्रांतीची लाट
तिन्ही मान्यवरांच्या विचारांना उपस्थित जनसागराने ‘जय सेवा, जय बिरसा’ च्या घोषणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्रात दरमहा ५-५ चिंतन परिषदा होत असून तरुणाई, महिला आणि बुद्धिवंत वर्ग मोठ्या संख्येने या चळवळीत सामील होत आहे. टिटवीच्या परिषदेने आदिवासी समाज आता जागा झाला असून आपला ‘आदिवासी धर्म’ विश्वाच्या पटलावर स्वाभिमानाने प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त झाला. (Tribal Religion)

Tribal Religionनियोजन आणि परिश्रम
हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोणार तालुक्यातील टिटवी ग्राम पंचायतच्या सरपंचा अनुसया नरवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्या गोदावरी कोकाटे, केशव फुफाटे, मदन धोत्रे, साहेबराव तनपुरे, नामदेव माघाडे, पंढरी कोकाटे, विठ्ठल फुफाटे, मारोती गीऱ्हे, परशराम कोकाटे, मुरलीधर कुटे, दामोधर तनपुरे, दत्ता घाटे, शांताराम जटाळे, उद्धव कोकाटे, प्रकाश राऊत, बबन कुटे, गेंदु राऊत, विजय मापारी, देवानंद नरवाडे, संजय कोकाटे, सतीश कोकाटे, भगवान नामदेव कोकाटे, ज्ञानेश्वर डोळे, एकनाथ घाटे, विष्णू तनपुरे, पिराजी कोकाटे आणि नसीम शेख यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रा. उद्धव पारधी व नागसेन साबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन भगवानराव कोकाटे यांनी केले.

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button